गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
मुंबई (दि. १८ सप्टेंबर २०२५) –
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या जनजाती गौरव दिवस निमित्त "अनुभव आदर्श संस्कृतीचा – महोत्सव आदिवासी कलागुणांचा" या कार्यशाळेचे आयोजन आज सह्याद्री राज्य अतिथी सभागृह, मुंबई येथे संपन्न झाले.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या विद्यमाने तसेच आदिवासी विकास मंत्री मान. डॉ. अशोकजी उईके यांच्या नेतृत्व व प्रेरणेने करण्यात आले.
*उद्घाटन सोहळा व मान्यवरांची उपस्थिती*
भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटन राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिव प्रकाशजी यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मान. प्रा. डॉ. अशोकजी उईके (आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा) माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.
अशोकजी नेते,खासदार डॉ. हेमंतजी सावरा,आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष उत्तमराव इंगळे,प्रदेश संघटनमंत्री अँड. किशोरजी काळकर,प्रदेश कार्यालय प्रमुख रविजी अनासपुरे, यांच्यासह अंजिक्य कुलकर्णी, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते, अरविंद गेडाम, एनडी.गावित, प्रदेश सोशल मिडीया प्रमुख तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके साहेब यांचे सहाय्यक डॉ. अक्षय जव्हेरी,गडचिरोलीचे मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचे सोशल मिडिया प्रमुख दिवाकर गेडाम, यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी व सोशल मीडियाचे प्रमुख उपस्थित होते.
_मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचा विशेष सत्कार भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
आदिवासी विकास मंत्री मान. डॉ. अशोकजी उईके यांनी "आबा धरती योजना" सहित आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीवर विस्तृत मार्गदर्शन केले.ते म्हणाले – “आदिवासी मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण, शैक्षणिक सुविधा व विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा माझा सगेडाम, आहे. समाजाच्या जनकल्याणासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासी समाज प्रगतिपथावर न्यायचा आहे.”
*आदिवासी गौरवाचे विचार*
राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिव प्रकाशजी यांनी आदिवासी जीवन, संस्कृती व परंपरेवर सविस्तर मार्गदर्शन करताना एकतेचा संदेश दिला. ते म्हणाले “धर्म और सांस्कृतिक की रक्षा और स्वतंत्रता ही खरी ताकद आहे. प्रत्येक राज्यात परंपरा व संस्कृती भिन्न असली तरी आपण सर्वजण ‘एक’ आहोत, अशी भावना समाजात रुजवली पाहिजे.”असे मत राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांनी केले.
*कार्यशाळेचे प्रमुख उद्देश*
या कार्यशाळेत विविध मुद्द्यांवर विचारमंथन झाले.1 आदिवासींची जनजातीय राजकीय स्थिती 2. आदिवासी जनजातीय विमर्श व विश्लेषण 3. सोशल मीडियाची कार्य समिती व भूमिका,4. आदिवासी परंपरा, कलागुण व कलासंपन्न वारसा 5. भगवान बिरसा मुंडा गौरव दिनानिमित्त विचार–चिंतन
कार्यशाळेत आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरा, संघटनात्मक शक्ती व कलागुणांचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. समाजातील युवा पिढीला शिक्षण, रोजगार व सांस्कृतिक ओळख यासाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरला.
जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून आदिवासींच्या संघटनात्मक बळकटीसाठी व समाज जागृतीसाठी ही कार्यशाळा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
Post a Comment