आमदार रामदास मसराम यांनी जाणल्या जोगीसाखर परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या....

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी 


आरमोरी - विधानसभेचे आमदार रामदास मसराम दौऱ्यावर असताना जोगीसाखरा परीसरास भेट देत नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या व सदर समस्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे आश्वासन यावेळी दिलें

याप्रसंगी शेतकऱ्यांच्या धान मका पिकाचे गारपिट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाली याचा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करावे .नवरगाव ते मजेवाडा जोगीसाखरा ते गाढवी नदिवर जाणाऱ्या अन्य शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पांदन रस्तेवरुण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल असतो त्यामुळे रोवण्या करण्यासाठी ट्रॅक्टर व ईतर साहित्य जाण्या येण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असतो त्यामुळे आपल्या स्तरावरुण मजबुतीकरणाचे कामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनेक प्रकरणे प्रलंबित असलेने लाभापासून वंचित आहेत तसेच पळसगाव येथील तिन हँडपंप बंद पडल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तसेच जोगीसाखरा सालमारा वैरागड रस्ता बरेच दिवसांपासून खड्डेमय झाला असल्यामुळे अपघाताला आव्हान देत आहे व वाहन चालविताना जागच्या जागी खोलवर खड्डे असल्यामुळे हा रस्ता त्रासदायक ठरत असल्याने डांबरीकरणासाठी प्रयत्न करण्यात यावे तसेच जोगीसाखरा लगत सालमारा रोडवरील नाल्यावर गेल्या वर्षात वनविभागाच्या वतीने निकृष्ट दर्जाचा बधारा बांधकाम करण्यात आले परंतु गेल्या पावसाळ्यातच दोन्ही साईड ने बंधारा फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन धान पिकाची नुकसान झालीं असल्यामुळे त्यांची चौकशी करून नव्याने बंधारा दोन्ही साईड बांधकाम करण्यात यावे आणि शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहीर बांधकाम मजूर करण्यात येते परंतु पाण्याची पातळी खोल गेल्याने बहुतेक विहीरीला पाणी लागत नसल्याने विहीरी कोरड्या पडतात त्यामुळे त्या बदल्यात शेतकऱ्यांना जमिनीवर बोअरवेल मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यावे तसेच नदि नाल्यांवर सिंचनासाठी कृषी पंपाकरीता शेतकऱ्यांना डिमांड मिळण्यासाठी प्रयत्न करावे असे समस्या जोगीसाखरा परीसरातील नागरीकानी आमदार रामदास मसराम यांच्या कडे सांगितलेअसता आमदार रामदासजी मसराम यांनी या सर्व समस्यांची नोंद घेतली असून संबंधित विभागांशी तात्काळ संपर्क साधून उपाययोजना करण्याचे आश्वासन नागरीकांना दिले.

या वेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम पंचायत समितीच्या मा सदस्या वृंदा ताई गजभिये मा सरपंच दिपाली मडावी बाबुराव टेभुणे यादोराव कहालकर नामदेवराव कुमरे महादेव मडावी भाऊराव मडावी प्रफुल्ल कहालकर केवळ गुरुनुले सविता येळमे मुक्ताबाई कन्नाके उज्वला मडावी मिनाक्षी कुमरे सिंधु सपाटे गगाबाई पेन्दाम रेखा कुमरे सरीता कुमरे रेखा कडाम अल्का मांढरे प्रतिभा सयाम मिना सुरपाम स्वरवती सडमाके उषाताई मडावी सुनिता मडावी येमिना सडमाके लता मडावी अंजनाबाई मडावी सिताबाई कुमरे या सह अन्य नागरिक उपस्थित होते

0/Post a Comment/Comments