गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर येत असलेल्या कोजबी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी सामाजिक विकास संस्था कोजबी यांच्या वतीने महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने महामानवाने भारत देशाला सुजलाम सुफलाम सर्वधर्मसमभाव शिक्षणासोबतच मानवी जीवनाचे महत्त्व असा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणारा सुशोभित संविधान अर्पण करून भारत देशाला
प्रगतीच्या वाटेवर नेले त्यांच्या संविधान रूपी कार्याचा गौरव करून 134 वी जयंती कोजबी येथील संस्थेच्या कार्यालयात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .जयंतीच्या निमित्ताने संस्थेचे सचिव भारत मधुकर कुमरे तथा अध्यक्ष दिनेश बनकर यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देऊन भारतीय संविधानाचे महत्व आदी विषयावर प्रकाश टाकून उपस्थित पाहुण्यांना प्रेरित केले . महामानव
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दिनेश बनकर तर सूत्रसंचालन संस्थेच्या कोषाध्यक्ष अश्विनी बनकर तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव भारत कुमरे यांनी मानले जयंती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय ग्रामीण व सामाजिक विकास संस्थेचे संचालक गण प्रामुख्याने उपस्थित होते.
Post a Comment