कोरची बोटेकसा मार्गासाठी अर्थसंकल्पात 94 कोटी 91लाखाचा निधी मंजूर, मा. आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याचे फलित...

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
गडचिरोली ब्युरो 


*देसाईगंज- राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात वसलेल्या कोरची तालुक्यातील लगतच्या छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या कोरची-बोटेकसा राज्यसिमा (राज्यमार्ग) या मार्गाच्या मजबुतीकरणासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात ९४ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील तीन वर्षांपासून या मार्गाच्या बांधकामासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती. त्याचेच हे फलित असल्याचे सांगीतले जात आहे.*


*मागील तीन वर्षांपासून सातत्याने पारवा-केळापुर- वणी-वरोरा,नागभीड- ब्रम्हपुरी-वडसा-कुरखेडा- कोरची ते बोटेकसा राज्यसिमा रस्ता बांधकामासाठी गजबे यांनी पाठपुरावा केला असता २०२४-२५ मध्ये हा रस्ता बांधकाम प्रस्तावित करण्यात आला होता.अर्थसंकल्पात त्या करीता निधी उपलब्ध करून देण्यात यावा करीता माजी आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा तसेच बांधकाम मंत्री यांची ४ मार्च २०२५ ला परस्पर भेट घेऊन रस्त्याच्या बांधकामा संदर्भात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.त्या अनुषंगाने कोरची-बोटेकसा या लगतच्या छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या राज्यसिमा मार्गासाठी अर्थसंकल्पात ९४ कोटी ९१ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.*

*अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील या राज्यसिमा मार्गाच्या बांधकामाला गती देण्यात आल्याने या मार्गावरील प्रस्तावित बांधकामांना गती मिळणार आहे.स्थानिक नागरीकांना आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून वाहतुक सोयीस्कर होणार असल्याने अतिसंवेदनशील भागातील विकासालाही चालणा मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान उपरोक्त राज्यसिमा मार्गासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने माजी आमदार गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.*

0/Post a Comment/Comments