गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली -आरमोरी
फेसबुक वर ओळखी करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याची घटना 3 नोव्हेंबरला उघडकीस आली आहे. पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपीला बेळ्या ठोकल्या आहेत. सूजीत कैलास गेडाम वय 22 वर्षे राहणार मोहाडी तालुका शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे . पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका 17 वर्षीय पीडित युवती सोबत सुजित गेडामची खाई महिन्या पूर्वी फेसबुकच्या माध्यमातूनओळख झाली एकमेकांना फेसबुकच्या माध्यमातून मेसेज करणे सुरू झाले. दरम्यान याचे रूपांतर प्रेमात झाले एकमेकांची फेसबुक वर ओळख झाली होती अशातच दोघांनी परस्पर एकमेकांना भेटण्याचा निश्चय केला .परस्पर एकमेकांना भेटल्यानंतर सुजित गेडामने युवतीला शरीर सुखाची मागणी करून युवतीवर अत्याचार केला . झालेल्या प्रकारामुळे युवती घाबरुन जावून सोबत घडलेल्या सर्व प्रकार युवतीने आपल्या स्वगावी जावून कुटुंबीयांना सांगितला . असता कुटुंबीयांनी लगेच आरमोरी पोलीस ठाणे गाठून सुजित गेडाम विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड न्याय संहिता 64(1)64(2 )(I),64(2 )87 137(२) अन्वये गुन्हा दाखल करून 31 ऑक्टोबरला आरोपी सूचित गेडाम ला पोलिसांनी त्याच्या स्वगावातून ताब्यात घेतले आणि न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोहूर्ले तपास करीत आहेत.
Post a Comment