दोन दिवसांमध्ये एकाच गावातील सहा जणांचा मृत्यू, गावामध्ये पसरले भीतीचे वातावरण....

गडचिरोली सुपरफास्ट

 न्यूज वृत्तसेवा 

चंद्रपूर

मिळालेल्या माहितीनुसार

चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा अंतर्गत कोरपणा तालुक्यात येत असलेल्या. आवाळपुर गावामध्ये दोन दिवसांमध्ये पाच व्यक्तीच्या मृत्यू झाला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी एका जणांचा मृत्यू झाल्याने गावांमध्ये खळबळ उडाली आहे .सदर मृत्यू उष्णतेने झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे .गावामध्ये मृत्यूचे सत्र सुरू झाल्याने गावातील लोक भयभीत अवस्थेत आहेत. आरोग्य यंत्रणेद्वारे प्राथमिक उपचार म्हणून गावात ओ आर एस चे वाटप सुरू करण्यात आले आहे. उष्णतेपासून बचाव करण्याचा सल्ला गावातील जनतेला आरोग्य यंत्रणेद्वारे देण्यात येत आहे पोंभूर्णा तालुक्यातील आवळापूर गावात सहा जणांचा मृत्यू झाला यामध्ये महादेव वासेकर वय 70 वर्ष अंबादास धोटे वय ७२ वर्ष चंद्रभान सोनटक्के वय 68 वर्ष संजय मांदळे वय 30 वर्ष अहीम शेख वय 30 वर्षे अशी मृतांची नावे आहेत या सहाही जणांचा शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. हवामान खात्याने उष्णतेची लाट वाढणार अश्या स्वरूपाचा अंदाज वर्तविल्याने दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चालला आहे याचा परिणाम मानवी जीवनावर दिसू लागला आहे. खबरदारी उपाय म्हणून प्रशासनाने जनतेने उष्णतेमध्ये फिरू नये असे आवाहन सुद्धा प्रशासनाने जाहीर केले आहे.

0/Post a Comment/Comments