तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या महिलेवर वाघाने केला हल्ला, वाघाच्या हल्ल्यात महिला झाली ठार....

 मुनिश्वर बोरकर 
संपादक 
गडचिरोली - आबेंशिवणी येथील महिला तेंदुपत्ता तोडण्यास जंगलात गेली असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने पार्बता बाईस ठार केले . गडचिरोली वरून १५ की.मी.अंतरावरील आंबेशिवणी येतील पार्बताआज दि. १४ मे ला पहाटेलाच दोन _ चार महिला तेदुपत्ता तोडण्यास नदि पलिकडे छोटा कुरखेड्याजवळ जंगलात गेल्या असता यापैकी पार्बता बालाजी पाल वय ६ 2 या महिलेस झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने पार्बता बाईवर झडप घालून तिला ओढत नेवून ठार केले. संगतिच्या इतर महिला गावाकडे धाव घेतल्या हि घटना दरम्यान पहाटे ७-३० च्या दरम्यान आंबेशिवणी जंगल  परिसरातील बिट नंबर ४०४ मधे घडली. बातमी वाऱ्यासारखी आंबेशिवणी गावात धडकताच कर्तव्यदक्ष पोलीस पाटिल भैसारे आंबेशिवणी यांनी चातगांव वनकार्यालय व पोलीस स्टेशन गडचिरोली इथे दिली. चातगाव वन क्षेत्राचे RFO पडवे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले.
 गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण फेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे . पार्बता बाईच्या पश्चात पती , मुलगा , सुन व नातवंडं अशा परिवार आहे. गावात हळहळ व्यक्त होत आहे. दौऱ्यावर असलेल्या खासदार अशोक नेते यांनी वनविभाग चातगाव चे RFO पडगेसी संपर्क साधुन तपास करून सदर महिलेच्या कुटुंबियांस आर्थीक मदत मिळावी असे प्रयत्न करणार आहेत. 
0/Post a Comment/Comments