अज्ञात मारेकर्‍यांनी युवकाच्या गळ्याला फास देऊन युवकाचा केला खून अन मृतदेह फेकून दिला शेतात आरमोरी तालुक्यातील बोडदा येथील घटना...
दिनेश रामाजी बनकर

मुख्य संपादक गडचिरोली

 सुपरफास्ट न्यूज वृत्तसेवा 

 पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार

आरमोरी 

तालुक्यापासून २० किलोमीटर अंतरावर आरमोरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या बोडदा येथील नामे प्रशांत रामदास उरकुडे वय 24 वर्ष राहणार बोडदा तहसील आरमोरी जिल्हा गडचिरोली हा युवक दिनांक 17 -4 -2024 ला रात्री दरम्यान परसाकडे खेमराज राऊत यांच्या शेताकडे गेला असता कोणीतरी अज्ञात दोन ते तीन व्यक्तींनी प्रशांत वरील रागामुळे प्रशांच्या गळ्यात दोरीने फास देऊन त्याला जीवानीशी ठार मारून त्याचा मृतदेह जवळच असलेल्या विजय राऊत यांच्या शेतामध्ये फेकून दिला दिनांक 18 -4 -2024 ला सकाळी या घटनेची वार्ता गावामध्ये पसरताच मृ ताचा भाऊ सुधीर रामदास उरकुडे यांनी घटनास्थळ गाठले आणि गावातील पोलीस पाटील यांच्या मदतीने आरमोरी पोलीस ठाणे घाटून अज्ञात मारेकरी विरुद्ध दिनांक 18 -4- 2024 ला पोलीस ठाणे आरमोरी येथे

 अज्ञात मारेकऱ्यां विरुद्ध फिर्याद नोंदविले लागलीच आरमोरी पोलीस घटनास्थळावर जाऊन मृतकाचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता आरमोरी येथे पाठविले घटनेची मोका चौकशी करून आरमोरी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध अपराध क्रमांक व कलम 118 , 2024 कलम ३०२ ,२०१,३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घटनेच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक आरमोरी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस स्टेशन आरमोरी हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments