बसपाचे गोन्नाडे प्रादेशिक पक्षाचे गणित बिघडवू शकतात .चिमूर लोकसभा निवडणुक.....



 . गडचिरोली 
मुनिश्वर बोरकर. 
संपादक 
गडचिरोली - चिमुर - गडचिरोली लोकसभा निवडणुकीत १० उमेदवार रिंगणात उभे असुन यात तिन प्रादेशिक पक्षाचे उमेदवार आहेत. भाजपाचे अशोक नेते , कांग्रेसचे डॉ. नामदेव किरसान तर बसपाचे प्राचार्य योगेश गोन्नाडे उभे आहेत. बसपा भारतात तिसऱ्या नंबरची पार्टी असुन चिमुर लोकसभा निवडणुकीत प्राचार्य गोण्णाने यांना बसपातर्फे उभे केले असुन बसपा हत्तीची चाल खेळत आहे. गोन्नाडे हे पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते असुन ते हलबा कोस्टी समाजाचे आहेत. बसपाने हलबा , कोष्टी 'माना समाजाला खुष केले असुन बसपाचे कॅडर फॉक्टर जोरदार आहे. बहुजनांना भाजपा व कांग्रेस नको आहे अश्यां मतदारांना बसपा जवळीक वाटत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने माना समाजाचे डॉ. रमेश गजबे यांना मैदानात उतरविले होते. व वंचित चा उमेदवार निवडुन आला पाहीजे म्हणून बहुजन समाजाची मते डॉ. गजबे यांच्या झोळीत पडून डॉ. गजबे तिसऱ्या क्रमांकावर होते. आता वंचित पाहीजे तेवढा प्रभाव पाडू शकणार नाही. वंचितांच्या प्रकाश आंबेडकरांची नेहमीचीच चाल आहे असे सर्वत्र बोलल्या जात असुन या निवडणुकीत बसपा आपला सावध पवित्रा घेऊन हत्तीची चाल खेळत आहे. बसपाचा हत्ती प्रादेशिक दोन पक्षापैकी एकाचे गणीत बिघडवू शकते. यात शंकाच नाही. प्राचार्य गो न्नाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन चिमुर क्षेत्रातील विकासासाठी माझी उमेदवारी उभी ठाकली आहे. मला निवडून घ्यावे असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे. पत्रकार परिषदेला बसपाचे गोपाळ खाबाळकर ' चांगदेव शेन्डे , बसपाचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट , अनिल साखरे , गणपत तावाडे , महिला अध्यक्ष माया मोहुर्ले , वेणुताई खोब्रागडे ' नरेश महाडोरे , रमेश मडावी , सुधिर वालदे , धारणे सर , प्रा. केशव भालेराव , हेमंत रामटेके आदिची उपस्थिती होती. प्रचार हत्तीच्या वेगाने सुरु राहणार असुन बसपाची मते नेहमीच स्थिर राहणार आहेत . यातही शृश्री मायावती यांचे ११ एप्रिल ला नागपूर येथे भव्य सभा आयोजीत करण्यात आलेली आहे. मायावतीच्या सभेनंतर बसपाला ताकद मिळणार आहे. प्रचाराला वेग येणार आहे. एवढे मात्र खरे

0/Post a Comment/Comments