जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविणाऱ्यांना न जुमानता जातीय सलोखा टिकवून ठेवला पाहिजे - डॉ. नामदेव किरसान


दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी वडसा-देसाईगंज येथे सर्वधर्म समभाव एकता मंडळाच्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॅा. नामदेव किरसान यांनी समाजात जाती धर्माच्या नांवावर द्वेष पसरविणाऱ्यांचा समाचार घेत अशा प्रवृतींना न जुमानता जाती-धर्मीय सलोखा टिकऊन ठेवण्याचा सल्ला उपस्थीतांना दिला. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर जाती-धर्मीय सलोखा निर्माण करून देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यात आलेली होती. परंतु अलीकडच्या आठ नऊ वर्षाच्या काळात देशाच्या एकतेला तडा देण्याचं काम काही विघटनकारी असामाजिक तत्व करीत आहेत. बहुसंख्य लोकांची मतं मिळवून सत्ता हस्तगत करण्यासाठी जाती-जातीमध्ये व धर्मा-धर्मामध्ये द्वेष पसरविण्याचे काम होत आहे. देशाची एकता अखंडता टिकवून ठेवण्यासाठी महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. ती एकता व अखंडता  खंडित करण्याचं काम विघटन वाद्यांकडून सतत होत आहे, अशा प्रवृत्तींना न जुमानता जात धर्मीय सलोखा आपण टिकवून ठेवला पाहिजे. राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलण्याचा सल्ला देश बांधवांना दिला त्यानुसार समाजामध्ये जाती धर्माच्या नावावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रेम भावाने व बंधू भावाने राहून जातीय सलोखा टिकऊन ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

              याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार मारोतरावजी कोवासे, उद्घाटक माजी आमदार तथा आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष जैसाभाई मोटवानी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. कविताताई माहुरकर, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष छगनजी शेडमाके, आरिफ भाई पटेल, गुरमीत सिंगजी अरोरा, गणीभाई पटेल, नितीनजी राऊत, निलोफरजी शेख, अब्दुल भाई रिजवी, लतीफ भाई शेख, राजन हिरेजी, अमोल मारकवार, रियाज भाई, विलासजी  बनसोड, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्रजी बुल्ले, मनोज ढोरे, किशोर मेश्राम, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments