गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
धानोरा ब्युरो
दिं. १३ एप्रिल २०२५, धानोरा (जि. गडचिरोली):
भारतीय जनता पार्टी धानोरा तालुक्याच्या आढावा बैठकीचे आयोजन धानोरा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडले. या बैठकीत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर तो एक कुटुंब आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने ‘माझा पक्ष, माझी जबाबदारी’ या भावनेने कार्य करणे गरजेचे आहे. पक्षवाढीच्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण ठेवले पाहिजे.”
भाजप कार्यकर्त्याचे चरित्र स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, "कार्यकर्त्याने पक्षाच्या ध्येयधोरणांची नीट समज ठेवून, पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना न्याय देत, वेळ देणारे आणि निष्ठेने काम करणारे असावे." संघटनात्मक बळकटीसाठी अशा कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तालुका अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की, “सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेत अहवाल प्रदेश पातळीपर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यामुळे कोणताही गैरसमज किंवा गोंधळ न होता शांतता राखावी आणि संघटनेच्या हितासाठी सामंजस्यपूर्ण वातावरण ठेवावे.”
या बैठकीस आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री तथा निवडणूक प्रमुख प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख अनिलजी पोहनकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा कृ.उ.बा.स. सभापती शशिकांतजी साळवे, तालुकाध्यक्षा लताताई पुन्घाटे, आदिवासी मिडिया सेल प्रमुख अक्षय उईके, तालुका महामंत्री विजय कुमरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment