तलावात बुडून इसमाचा झाला मृत्यू ,आरमोरी तालुक्यातील लोहारा येथील घटना.....



गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 

तलावात बुडून इसमाचा झाला मृत्यू
आरमोरी तालुक्यातील लोहारा येथील घटना
लोहारा येथे तलावात बुडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 4-10 -2024 सोमवार रोजी 11.30 वाजे दरम्यान घडली सविस्तर वृत्त असे की लोहारा येथील वामन बाजीराव कुमरे वय 45 वर्ष आपल्या मुलासोबत नामे सुमित वामन कुमरे वय 17 वर्षे या मुलासोबत शेतातील धान्य कापले असल्याने ते पाहण्याकरिता शेताकडे गेले होते .मात्र ते शेतामध्ये गेले असताना त्यांना शौचास लागल्याने ते शेतापासून जवळच असलेल्या खोलबोडी तलावात गेले मात्र त्यांना शौचास झाल्यावर पाण्याची गरज असल्याने तलावातील काठावर गेले असता त्यांना चक्कर मिर्गी आल्याने ते तलावातील पाण्यामध्ये बुडून   त्यांचा मृत्यू झाला . वामन कुंमरे यांचा मुलगा शेतामध्ये त्यांची वाट पाहत होता. वडिलांना शेताकडे येण्याकरिता अति जास्त वेळ झाला म्हणून मुलगा सुमित तलाव कडे गेला असता वामन कुमरे पडलेल्या अवस्थेमध्ये दिसले.



 लगेच मुलाने आरडा रोड करून घटनेची माहिती गावातील लोकांना दिली घटनास्थळी गावातील लोकांनी धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना दिली लगेच पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना दिली. आरमोरी पोलीस लगेच घटनास्थळी दाखल होऊन मृताचा पंचनामा करण्यात आला व मृतदेह शववविच्छेदनाकरिता करिता आरमोरी येथे पाठवीण्यात आला. घटनेचा तपास एपीआय कामतूरे सर पीएसआय विजय चलाख हेड कॉन्स्टेबल पिल्लेवान करीत आहेत.




0/Post a Comment/Comments