वीष प्राशन करून युवकांने केली आत्महत्या .....
गडचिरोली सुपरफास्ट

न्यूज वृत्तसेवा

गडचिरोली जिल्हा अंतर्गत धानोरा तालुक्यातील तोया गोंदी या गावांमध्ये एका युवकांने वीष प्राशन करून आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुधाकर महारू पोटावी असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे . सदर घटना 9 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली
प्राप्त माहितीनुसार सुधाकर पोटावी या युवकाचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते या प्रेमातूनच दोघांनी लग्न करण्याचा विचार सुद्धा केला होता .परंतु मुलीच्या घरच्या लोकांनी घर जवाई म्हणून तुला राहावे लागेल अशा प्रकारच्या प्रस्ताव सुधाकर यांना दिल्यामुळे सुधाकरची मानसिकता ढासळली आणि मनामध्ये अस्वस्थत्ता पसरली होती. ही बाब सुधकरचा मनात खटकत असल्याने सुधाकर हा शेतावरती गेला आणि शेतावरून त्याने 9 जून रोजी आंबे घरी आणले घरी आंबे आणून दिल्यानंतर दुपारच्या सुमारास तो पुन्हा आपल्या शेतावरती निघून गेला मात्र त्या दिवशी वादळ वारा सुरू झाल्याने शेतावरील सर्व घरातील मंडळी आपल्या घरी आले परंतु सुधाकर घरी आला नाही . सुधाकर घरी आला नाही म्हणून घरच्यांनी शेतावरती धाव घेतली मात्र शेतावर गेले असता सुधाकर हा शेतामध्ये मृताअवस्थेत आढळला लगेच त्याला घरच्यानी आस्था दाखवत सुधाकर याला धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी सुधाvकरला तपासले असता सुधाकरला मृत घोषित केले. घर जवाई म्हणून सुधाकर च्या मनात संसार करण्याची इच्छा नसल्याने त्याच्या मनावरती विपरीत परिणाम होऊन सुधाकरने टोकाचे पाऊल उचलल्याने सुधाकरचा नाहक जीव गेला यामुळे गाव परिसरात आप्तेष्ट मित्र
मंडळी याचे कडून हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेचा पुढील तपास धानोरा पोलीस करीत आहेत

0/Post a Comment/Comments