गडचिरोली येथील युवक रितेश नागदेवते याचा पोर्ला गावाजवळ आढळला मृतदेह...दोन दिवसापासून घरून झाला होता बेपत्ता....

.




 गडचिरोली
 मुनिश्वर बोरकर
संपादक 
 गडचिरोली _ गडचिरोली वरून १३ कि.मी. अंतरावरील पोर्ला जवळ रामनगर गडचिरोली येथील एका व्यक्तीचा अकस्मित मृत्यु झाल्यामुळे एकच खळबळ माजली. आज दि. 3 जुन ला दुपारी ४ वाजता चे दरम्यान रितेश नागदेवते वय ४० वर्ष राहणार रामनगर हा पोर्ला ते मोहझरी रोड दरम्यान गजानन महाराज मंदिराजवळ अकस्मित मृत्यु झाला. रितेश हा गेल्या दोन दिवसा पासुन बेपत्ता होता असे त्यांच्या आईने सांगितले. मृत्यु समयी तो बनियान चड्डीवर होता यावरून शंका कुशंका निर्माण होत आहे. तो




 गडचिरोली वरून पोर्ला जवळच मरण्यास का गेला असावा . अंगावर कोणत्याच प्रकारच्या जखमा नाहीत. उष्मघात तर नसावा की दारु पिऊन असावा अश्या अनेक शंका निर्माण होत असुन. गडचिरोली पोलीस तपासाअंती मर्म दर्ज करून प्रेत उत्तर तपासणीस सामन्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले.

0/Post a Comment/Comments