आरपीआय चा चंद्रपूर चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसला पाठिंबा नाही सिद्धार्थ सुमन

गडचिरोली सुपर फास्ट
नुज वृत्तसेवा
चंद्रपूर 
चंद्रपूर :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संस्थापक :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर )चे नेते दिवंगत दादासाहेब गवई हे नेहमी सपोर्टेड राहिलेले आहेत. त्यामुळे रिपब्लीकन मतदारांना काँग्रेसचा पारंपारिक मतदार म्हणुन गृहीत धरण्यात येते. परंतु या निवडणुकीत रिपाइंने चंद्रपूर व चिमुर लोक सभा क्षेत्रात .काँग्रेसला वा इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. पक्षाचे सर्व पदाधिकारी कोणाच्याही प्रचारात सक्रीय नाहीत. त्यामुळे रिपब्लीकन मतदारांनी वा कार्यकर्त्यांनी याची नोद घ्यावी असे आवाहन रिपब्लीकन पार्टी आँफ इंडीयाचे नागपुर प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ सुमन यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलेले आहे.
विरोधक नेहमीच रिपब्लीकन पार्टी आँफ इंडीया हा काँग्रेसला शरणागत झालेला पक्ष आहे असा प्रचार करीत असतात. हा एकदम खोडसाळ आणी चुकीचा प्रचार आहे. शिवाय काँग्रेसही रिपब्लीकन मतदारांना गृहीत धरुत असते. रिपाइं काँग्रस सोबत राजकीय भुमिकेतुन तडजोड करित आलेली आहे. याचा अर्थ ती काँग्रेस सोबत असेलच असे नाही. 19 एप्रिल 24 ला लोकसभा निवडणुकीच्या होणाऱ्या मतदानात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ने काँग्रेस वा इतर कोणत्याही पार्टी अथवा उमेदवारा पाठिंबा दिलेला नाही याची नोंद घ्यावी असे या प्रसिद्धी प्रत्रकाद्वारे जाहीर करण्यात येत आहे.
*********************
.

0/Post a Comment/Comments