भोवळ आल्याने खाली पडला अन् राहिला कायमचाच झोपुन ... दोटकुली बसस्टॉप वरील घटना....गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
पी . के. सातार तालुका
प्रतिनिधी
चामोर्शी
मिळालेल्या माहितीनुसार चामोर्शी तालुक्यातील सोनापूर येथील सोमेश्वर राऊत वय 30 वर्ष हा युवक सकाळच्या सुमारास बाहेर दोटकुली बस स्टॉप परिसरात गेला होता आणि त्याला अचानक भोवळ आल्याने तो खाली पडला आणि तिथेच झोपून राहिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ६-७-२०२४ ला दुपारच्या सुमारास उघडकिस आली .
सोमेश्वर राऊत यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्याला एक मुलगा सुद्धा आहे .मात्र काही कारणाने त्याची पत्नी माहेरी निघून गेली यामुळे सोमेश्वर राऊत यांची मानसिकता बिघडली होती अशी माहिती मिळाली आहे. आणि या माणसिकतेमधूनच तो इकडे तिकडे भरकटत होता वेळेवर जेवण सुद्धा करीत नव्हता मिळेल तिथे झोपणे मिळेल तिथे खाणे अशी त्याची दिनचर्या होती अशी माहिती मिळाली आहे 5-7-2024 ला सकाळच्या सुमारास घराबाहेर पडला असता तो दोटकुली बसस्टॉप वर मृत अवस्तेथ 6-7-2024 शनिवारला दुपारच्या सुमारास आढळुन आला घटनेची माहिती चामोर्शी पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी पोलीस दाखल होवुन आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृताचे प्रेत शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय चामोर्शी येथे पाठवीण्यात आले. सोमेश्वर राऊत याला भोवळ आली आणि तो तिथेच झोपून राहिल्याने मृत्यु झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
घटनेच्या पुढील तपास चामोर्शी पोलीस करीत आहेत सोमेश्वर या युवकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने मित्रपरिवार व आप्तेष्ट यांच्याकडून हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments