गडचिरोली जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान्य अध्यापही पडूनच... धान्याचे उचल करण्याची मागणी







दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्तसेवा 
गडचिरोली:-
 गडचिरोली जिल्ह्यात आदीवासी विकास महामंडळ हे आदीवासी विवीध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आधारभूत किमतीत शेतकऱ्यांचे धान खरेदी करते. काही अटी व शर्ती पूर्ण करणार्या आ.वि.कार्यकारी सोसायटीला धान खरेदी करन्याची मुभा देण्यात येते. दरवर्शी हंगामात सोसायट्या शेतकऱ्यांकडून धान खरेदी करतात, परंतु आदीवासी विकास महा मंडळ वेळेवर धानाची उचल करीत नसल्यामूळे सोसायट्या प्रचंड नुकसानीला समोरे जात आहेत. यांत सोसायटीचा काही अपराध नसतांना नाहक कमीशन रोखून धरने,घट मंजूर न करने, पावसामुळे भिजलेले धान काळे पडून खराब होत आहेत. याला शासनाचे आदिवासी विकास महामंडळ जबाबदार असून सोसायटी जबाबदार असल्याचे गृहीत धरून सोसायटीवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शासनाच्या या दोगल्या नीतीला कंटाळून सोसयट्याचे संचालका सह कर्मचारी वैतागले आहेत. महामंडळाने वेळेवर कींवा खरेदी नंतर लगेचच धान उचल केली असती तर घट कमी आली असती. अवकाळी पावसाने धान खराब झाले नसते.





 सोसायटीला कमीशन पोटी मिळनारी रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी अशी मागणी होत आहे. सोसायटिकडे हमालाला मजूरी देण्यासाठी पैसा नाही. अडचणीत सापडलेल्या सोसाट्यांचा प्रश्न महामंडळाने तातडीने सोडन्यात यावा. तसेच आलेली संपूर्ण घट मंजूर करुन खरेदी केंद्रावर पडून असलेला माल लवकरात लवकर उचल करन्यात यावा असी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments