अंगारा येथून येणाऱ्या बसला ट्रॅक्टरने दिली जोरदार धडक, दोन्ही वाहने शक्तीग्रस्त....


दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
 गडचिरोली
सुपरफास्ट न्यूज वृत्तसेवा 

वैरागड : अंगारावरून आरमोरीकडे येणाऱ्या बसला कोसरी येथे उभ्या बसला ट्रॅक्टरने धडक दिली. सुदैवाने अप्रिय घटना घडली नाही. मात्र, दोन्ही वाहने क्षतीग्रस्त झाली. ही घटना १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली.

गडचिरोली आगाराची बस (एमएच ०६ एस ८८४५) अंगारा येथून प्रवासी घेऊन आरमोरीकडे येत होती. प्रवाशांना उतरविण्यासाठी बस कोसरी येथे रस्त्यालगत उभी होती. यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने बसला जोराची धडक दिली. यात बस व ट्रॅक्टर क्षतीग्रस्त झाला. या मार्गाच्या


दुरुस्तीकामाला मंजुरी मिळाली आहे, पण अद्याप काम सुरू झालेले नाही. कामाला लवकर सुरुवात करावी अशी मागणी उपसरपंच त्रिलोक गावतुरे, प्रकाश लेनगरे यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments