अंगणवाडी सेविकांनी घेतले जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण
मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकां साठी जादूटोणाविरोधी कायद्याचे व अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रशिक्षण कार्यक्रम नागपुर पंचायत समिती च्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते .
त्यासाठी शासनाने महा.अनिस चे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांना जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांना क्रमाक्रमाने प्रशिक्षण देऊन समाजात अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात जनजागृती करण्याचे लेखी आवाहन केले आहे . त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाला अंगणवाडी सेविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दुर दुरच्या खेड्या पाड्यातून आलेल्या तब्बल 139 अंगणवाडी सेविकांनी सभागृह खचाखच भरलेला होता.या प्रशिक्षण कार्यक्रमा च्या अध्यक्षा बाल विकास प्रकल्प अधिकारी मा. उज्वला ढोके या होत्या .जिल्हा विविध उपक्रम कार्यवाह चंद्रशेखर मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन करुन कार्यक्रमाची शुरुवात केली. जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.देवानंद बडगे यांनी चळवळीचे 'हिच अमुची प्रार्थना' हे गीत सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली .या प्रसंगी जादुटोणा विरोधी कायदा म्हणजे काय,तो कसा लागू होतो, कायद्याचे प्रावधान व त्याची कलमें कोणती  याचे सविस्तर प्रशिक्षण चित्र पोस्टर सहीत जिल्हा प्रधान सचिव डॉ प्रा सुनील भगत यांनी समजावून सांगितले.
त्यानंतर जादुटोणा चे प्रत्यक्ष चमत्कार सादरीकरण उत्तर नागपुर शाखेचे कार्याध्यक्ष देवानंद बडगे व रामभाऊ डोंगरे यांनी संयुक्तपणे सादर केले ,तेव्हा अंगणवाडी सेविका अक्षरशः भारावून गेल्या होत्या. प्रत्येकांनी सदर प्रयोगा मागील खरं विज्ञान समजून घेतलं व आपापल्या कार्यक्षेत्रात जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा निर्धार केला. अंधश्रद्धा निर्मूलना बाबतीत उपस्थितांच्या सर्व  प्रश्नांचे निराकरण रामभाऊ डोंगरे यांनी केले.
कार्यक्रमाला पर्यवेक्षिका शर्मिला जाधव व त्यांची पुर्ण टीम उपस्थित होती. संचालन चित्तरंजन चौरे यांनी तर  आभार पर्यवेक्षिका तारा बोराडे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments