गडचिरोली जिल्ह्यासाठी पुढील ५ दिवसाचा हवामान अंदाज

·       भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये,
·       दिनांक ५ व ६ मे २०२३ रोजी *तुरळक ठिकाणी* अती हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे,
·       दिनांक ५ व ६ मे २०२३ रोजी तुरळक ठिकाणी 
·*मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आला आहे 
·        


*कृषी सल्ला*
·       गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी अती हलक्या ते हलक्या स्वरुपाचा पाऊस,मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट,लक्षात घेता, शेतीमधील अति महत्वाची कामे हि सकाळी ११ वाजता पूर्वी करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे. शेतकरी, शेतमजूर यांनी स्वतः झाडाखाली आसरा घेणे टाळावे तसेच जनावरे हि मोकळ्या जागेत चरावयास टाळावे, पशुधनास गोठ्यामध्ये पुरेश्या चारा व पाण्याची व्यवस्था करावी. जनावरे (गायी, म्हशी, शेळ्या इत्यादी) हि झाडाखाली बांधणे कटाक्षाने टाळावे. जनावरांना बांधण्याचे ठिकाण हे इलेक्ट्रिक पोल, पाण्याचे स्त्रोत, उंच झाडे, जुनाट इमारती यापासून दुर असावे. आवश्यकता असल्यास गोठ्याची देखभाल व दुरुस्तीची कामे हि स्थानिक शांत व स्वच्छ हवामान असताना करावी.
·       पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील उन्हाळी पिकाची काढणी केल्यानंतर शेतमाल उघड्या जागेत वाळवायला न ठेवता शेतमाल हा शेड मध्ये वाळवावा. शेडची व्यवस्था नसल्यास, शेतमाल शेतामध्ये उंचवट्याच्या ठिकाणी साठवावा तसेच मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी.
·       पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी बाजार व मंडई मध्ये शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्यावर न ठेवता शेड मध्ये ठेवावा, जेणेकरून शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही.
·       कृषी रसायनांच्या फवारणीची कामे पुढील ०२ दिवस पुढे ढकलावी. किंवा स्थानिक स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना करावी. तसेच  सकाळच्या वेळी प्राधान्य द्यावे.
·       विजांच्या ठिकाणांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाईटनिंग अलर्ट (Damini- Lightning Alert ) या मोबाईल अँप चा वापर करावा.
·       गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हवामान आधारित कृषी सल्ला सेवा व्हॉट्स अॅप द्वारे प्राप्त करण्यासाठी  बुद्धेवार नरेश विषय विशेषज्ञ, कृषी हवामान शास्त्र यांचा हा ९०९६४०६९३७ मोबाईल क्रमांक व्हॉट्स अॅप ग्रुप मध्ये समाविष्ठ करावा.

*सौजन्य*
·       जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, सोनापुर गडचिरोली.

0/Post a Comment/Comments