प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने श्रमिकासमवेत कामगार दिन साजरा*
पुणे, पिंपरी चिंचवड : १ मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
त्याचाच एक भाग म्हणून श्रमिकाप्रती प्रेम व आपुलकी व्यक्त करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा पिंपरी चिंचवडच्या वतीने श्रमिकासमवेत कामगार दिन साजरा करण्यात आला. ज्यांच्यामुळे आपण स्वच्छ्ता अनुभवतो, परिसर रोगमुक्त होण्यास मदत होते अशा श्रमिक    वर्गाच्या कार्याची दखल घेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने पिंपरी लोखंडे भवन   येथील पीसीएमसीच्या श्रमिकांना अल्पोपहार देऊन कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सर्व श्रमिक वर्गाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी लोखंडे कॉम्प्लेक्स येथील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा मंदा बनसोडे, उपाध्यक्षा उषा लोखंडे, सचिव निर्मला जोगदंड, कार्याध्यक्ष किशोर सुर्यवंशी, कोषाध्यक्ष अली ईराणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments