बिना गुंडा धबधब्यात दोघांचा मृत्यू , गडचिरोली येथील फुले वार्डातील मयुरी कापकर दुःखात बुडाली.....





गडचिरोली 
मुनिश्वर बोरकर 
संपादक 
गडचिरोली - पाच दिवसापूर्वी लग्न झालेले पती - पत्नी साडा एकदरीत ६ व्यक्ती निसर्गरम्य बिनागुंडा धबधबा पाहायला गेलेत. पाण्यात पोहता येत नसल्या अभावी व खोल पाण्याचा अंदाज चुकल्याने त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला चंद्रपूर व आरमोरी येथे शोककळा पसरली तर फुले वार्डातील मैय्युरी वर सुद्धा दुःखांचा डोंगर कोसळला. नवणीत राजेंद्र धात्रक २७ ग्रामसेवक अंकिसा यांचा विवाह दिनांक ७ जुन ला मैय्युरी कापकर फुले वार्ड चांभार मोहला )गडचिरोली हिच्या सोबत झालेला होता. लग्नानंतर तिन पुरुष व तिन स्त्रिया निसर्गरम्य ठिकाण बिनागुंडा धबधबा तालुका सिरोंचा ला दि . ११ जुन २०२४ ला दुपारी १ चे दरम्यान पाहायला गेलेत. त्यापैकी ग्रामसेवक नवरदेव यांनी आंघोळ करण्याकरीता गेला त्याला २० फुट खोल असलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात गेला त्याला पोहताही येत नव्हते. तितक्यात साडा बादल शामराव हेमके ३९ राहणार आरमोरी यांनी भाऊजीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली बादल यालांही पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही मृत्यु झाला. सदर घटनेच्या वेळी तिन महिला धबधब्याचे काठावर हात पाय धुत होते . नवनित आणि बादल यांच्या मृत्युमुळे चंद्रपूर व आरमोरी येथे शोककळा पसरली. मैय्युरी हिचे हळद वारण्यापूर्वीच पतीच्या मृत्युमुळे तिच्यावर दुःखाचे डोंगर उभे ठाकले. नवनित आणि बादल यांचे मृत्युदेह 3 वाजता काढण्यात येवून अंकिसा पोलीसांनी चौकशी करून मृत्युदेह उत्तरतपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय अंकिसा येथे पाठविण्यात आले. एकंदरीत चंद्रपूर - आरमोरी . गडचिरोली या तिन्ही ठिकाणी नवनित आणि बादल यांच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

0/Post a Comment/Comments