समाजसेवक ज्ञानेश्वर पायधन यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्य पुरस्काराने सन्मानित....

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
संपादक
 प्रा. मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


गडचिरोली - गडचिरोली येथील समाजसेवक ज्ञानेश्वर पायधन यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्य पुरस्काराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
सामाजिकन्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दि. १० जुनला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे 2023 - 24 वर्षाचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्य पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
समाजसेवक ज्ञानेश्वर पायधन यांनी मातंग समाजातील लोकांची सेवा करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नेहमी झडत राहीले त्यामुळे त्यांना समाज कार्याचा गौरव म्हणुन महाराष्ट्र शासनाने त्यांना सन्मानित केले. मातंग समाजाचे प्रेम व सहकार्य मला मिळाले तसेच राज्य शासनाने माझी निवड केली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे त्यांनी आभार मानले. त्यांच्या निवडीबद्दक मातंग समाजाचेच नव्हे तर इतर समाजांनी सुद्धा त्याचे अभिनंदन केले. कार्तिक कांबळे , समय्या पसुला , गोपाल रायपूरे , शंकरअण्णा सेनिगारपु , प्रा. मुनिश्वर बोरकर , भोजराज कानेकर , प्रमोद राऊत , डोमाजी गेडाम ,काटवले , अंडेलकर आदिनी अभिनंदन केले असुन लवकरच ज्ञानेश्वर पायधन यांचा बामसेफ - रिपाईच्या वतीने सत्कार करण्याचे ठरविण्यात आल्यांची माहीती भोजराज कानेकर यांनी दिली.

0/Post a Comment/Comments