गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी
संपूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चौकशी आणि अटक सत्र सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यातील बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी भाजपा पंचायत राज व ग्राम विकास विभाग गडचिरोली चे जिल्हा उपाध्यक्ष कैलास बगमारे यांनी मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय आरमोरी येथे सेवा ज्येष्ठता यादी डावलून श्री साईनाथ अद्दलवार यांची नियुक्ती आणि शासंन निर्णय ,2 मे 2012 नुसार शिक्षक भरती प्रक्रिया बंद असताना त्यांनी केलेली बेकायदेशीर शिक्षक भरती या संदर्भात जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी , विभागीय आयुक्त नागपूर येथे तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी अधिकारी मा. अविश्यांत पंडा यांनी 20 मे 2025 रोजी पत्र व्यवहार करून शिक्षणाधिकारी माध्यमिक वासुदेव भुसे यांना उचित कार्यवाही करण्या सर्दर्भात कळवले आणि या प्रकरणी शिक्षणाधिकारी यांनी संबंधीत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री साईनाथ अद्दलवार यांना चौकशी साठी आपल्या कार्यालयात 29/5/2012 ला बोलवले सुद्धा तरी पण या सुनावणी चा चौकशी अहवाल तक्रार कर्ते यांनी वारंवार मागणी करून सुद्धा त्यांना चौकशी अहवाल अजून पर्यंत प्राप्त झाला नाही त्यामुळे कदाचित शिक्षणाधिकारी माध्यमिक वासुदेव भुसे यांच्या कडून हा प्रकरण दाबण्याचा प्रकार तर सुरू नाही ना असा प्रश्न तक्रार कर्ते कैलास बगमारे यांच्या कडून केल्या जात आहे .
ह्या प्रकरणी पारदर्शक चौकशी नाही झाली तर आपण न्यायालयात याचिका दाखल करणार अशी प्रतिक्रिया तक्रार कर्ते कैलास भाजपा पंचायत राज व ग्राम विकास विभाग गडचिरोली चे जिल्हा उपाध्यक्ष कैलास बगमारे यांनी दिली आहे
Post a Comment