प्रहार दिव्यांग अपंग संघटना कार्यालय खापा (तुमसर)येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....

गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
तुमसर ब्युरो 


दिनांक 14 एप्रिल हा दिवस विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
डॅा बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणुन ओळखल्या जातात, बाबासाहेब यांनी अत्यंत विपरीत परिस्थीत शिक्षण घेत त्यांनी परिस्थीतीवर मात करुन आपले शिक्षण पुर्ण केले व ज्या बहुजन व दलीत समाजाला अस्पृश्यतेचे जीवन जगाव लागत होते त्या समाजासाठी बाबासाहेबांनी स्व:त लढा दिला व आज करोडो अनुयायी माना-सन्मानाच जिवन जगत आहे. हि पुण्याई माझ्या बाबासाहेबांची. अशाच महामानवाला त्रिवार अभिवादन.
अशा या महामानवाची आज १३५ वी जयंती प्रहार दिव्यांग संघटना कार्यालय खापा (तुमसर) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रम चे अध्यक्ष सौ. कीर्तीताई पिकलमुंडे सरपंच ग्रा.खापा, कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे सौ.



 समिताताई ठवकर सदस्य, खुशाल भोयर सदस्य, डॉ. मनोजकुमार नदेश्वर पशुधन विकास अधिकारी, कु. वर्षा सिंगाडे मॅडम, ठवकर ताई, वच्छला कोल्हटकर, गोपिका टेटे , रविचंद गणवीर, प्रकाश डोगरे, कार्यक्रम चे मुख्य आयोजक श्री शेषराव गणवीर (प्रहार संघटना तुमसर तालुका प्रमुख ) तसेच उपस्थीत सर्व दिव्यांग व सर्व बौध्द बांधव खापा/तुमसर यांच्या प्रमुख उपस्थीतीत कार्यक्रम पार पडला.

0/Post a Comment/Comments