गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
आरमोरी :- तालुका मुख्यालयापासून 20 km अंतरावर असलेल्या कोजबी येथे महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी सर्वप्रथम महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून जयंती कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गावातील तीनही चौकात ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले .
याप्रसंगी सुधीर जी बोदेले, युवराज साहारे, तुकडाबाई लिंगायत यांच्या अध्यक्षतेखाली तर ईश्वरजी मेश्राम, गिरिधरजी चाहांदे, गुलाबजी ताडाम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून श्री. दिनेश बनकर पत्रकार, अश्विन बोदेले पत्रकार, माधुरी सहारे पोलीस पाटील, प्रलय चहांदे उपसरपंच, भगवान मोहिते, केशव चहांदे , नानाजी बोदेले , डोमा शंभरकर , विजय जनबंधू, समीर मोहिते, रामकृष्ण गेडाम , सौ. पंचशीला मूल्लेवार ,
सौ. सुषमाताई बोदेले माजी ग्रामपंचायत सदस्य, कुसुम बोदेले, गयाबाई बोदेले, रत्नमाला चहांदे, अस्मिता बोदेले , अंजू सहारे, अश्विनी बनकर, सरिता बनकर , कुसुम मेश्राम , प्रज्ञा राहाटे तसेच गावातील संपूर्ण समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Post a Comment